एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं, सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो? अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.
अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे? प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो. सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?
ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो. मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस. तुझा आवाज सुंदर आहे. तू अतिशय काळजी घेणारी आहेस. तू अतिशय प्रेमळ आहेस तू विचारी आहेस. तुझे हास्य मोहक आहे. तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.
प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा. प्रिये, तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो. पण आता तू बोलू शकतेस का? नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो. पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते? नाही. नक्कीच नाही. म्हणूनच.... मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो. परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे. तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !
काय म्हणता ? या ओळी चिल्लर वटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करत येतं; उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत; व्याकरणात चूकलात तरी प्रेम करता येतं; कोन्वेंटमधे शिकलात ती प्रेम करता येतं !
सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लगतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ? तुमची आमची सोळा जेव्हा, सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बूडता बूडता वाचलो होतो !
बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं : प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !
प्रेमबीम झूट असतं म्हणणारी मणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला: "आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबी कधीसुद्धा केलं नाही ! आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? "
त्याला वाटलं मला पटलं ! तेव्हा मी इतकंच म्हणलं :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणी आमचं मात्र 'सेम' नसतं !
तिच्या सोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने ! एक चोकलेट अर्ध अर्ध खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं, प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं, घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!
एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,
ReplyDeleteसांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.
अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?
प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.
सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?
ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो. मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस.
तू अतिशय प्रेमळ आहेस
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे.
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.
प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.
प्रिये,
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.
पण आता तू बोलू शकतेस का?
नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.
पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.
खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते? नाही. नक्कीच नाही. म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
ReplyDeleteबालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.
कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांची कविता
ReplyDeleteप्रेम म्हणजे काय असतं…….
चातकाला पावसाशी असतं,
टापोर्या दव बिंदूला गवताच्या पात्याशि असत.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे चंद्राला चांदन्यांशी असत,
इंद्रधनुष्याला क्षीतिज्याशी असत,
सळसळणार्या वार्याला गर्जणार्या ढगांशी असत.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे फुलपाखराला फुलाशि असतं,
काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,
गुणगुणनार्या पतंगाला मीनमिनत्या दिव्याशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं.
जस सुखाला दुःखाशी असतं,
हसण्याला रडण्याशी असतं,
रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.
प्रेम म्हणजे काय असतं.
जे हळूवार जपायाच असतं,
हृदयात साठवून ठेवायच असतं,
कितीही दुःख झाल तरी हसत जगायाच असतं,
प्रेम म्हणजे काय असतं.
जे फक्त शेवटपर्यंत…
तिच्यात आणि आपल्यात असत
त्याच्यात आणि आपल्यात असत..
प्रेम म्हणजे प्रेम असतं
ReplyDeleteप्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !
मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात ती
प्रेम करता येतं !
सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !
बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !
कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !
प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण
चक्क मला म्हणाला:
"आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी
प्रेमबी कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का ?
प्रेमाशिवाय अडलं का ? "
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हणलं :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं मात्र 'सेम' नसतं !
तिच्या सोबत पावसात कधी
भिजला असाल जोडीने !
एक चोकलेट अर्ध अर्ध
खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत
तासनतास फिरला असाल
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!
मंगेश पाडगांवकर