प्रा. रिचर्ड थेलर यांना त्यांच्या वर्तनात्मक अर्थशास्त्रातील 'नज थेअरी'साठी (कोपरखळी सिद्धान्त) नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. थेलर यांचा 'कोपरखळी सिद्धान्त' अर्थशास्त्राला वेगळं वळण देणारा असला तरी त्याचा वापर फक्त अर्थशास्त्रापुरताच सीमित राहिलेला नाही. त्याचा वापर उद्योग क्षेत्रात प्रामुख्यानं झाला असला तरी, त्याचा परिघ आंतरराष्ट्रीय राजकारण बदलण्यासाठीही तितकाच प्रभावीपणे झालेला आहे. त्याचप्रमाणे तो अर्थशास्त्राच्या पलिकडे जाऊन राजकारण आणि समाजकारणातही झालेला आहे. विशेषतः जनहिताची धोरणं राबवताना विविध देशांच्या सरकारांनी या सिद्धान्ताचा योग्य उपयोग करून घेतला आहे.
थेलर यांचा कोपरखळी सिद्धान्त नेमका काय आहे हे पाहू.
थेलर यांचा सिद्धान्त वर्तनात्मक अर्थशास्त्राशी (behavioural economics) निगडित आहे. कुठल्याही अर्थिक घडामोडीच्या मध्यभागी व्यक्ती असते. ती व्यक्ती काय खरेदी करते, कशी खरेदी करते, तिची आवडनिवड काय, तिच्या खरेदी-विक्रीवर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो (उदा. वस्तू महाग वा स्वस्त होणे.) अशा मुद्द्यांचा विचार वर्तनात्मक अर्थशास्त्र खोलात जाऊन करते. त्या आधारावर बाजाराचे ठोकताळे ठरतात, बाजाराची दिशा ठरते, मागणी-पुरवठ्याची गणितं मांडली जातात, त्याचा वस्तूंच्या उत्पादनावर, किमतीवर परिणाम होत असतो. इतकेच नव्हे तर नजीकच्या वा लांब भविष्यात व्यक्तीचा कल कसा राहील याचाही अंदाज घेतला जातो. याचा सरळसाधा अर्थ असा की, आर्थिक व्यवहारात व्यक्तीचं वर्तन कसं राहील याचा केलेला अभ्यास म्हणजे 'वर्तनात्मक अर्थशास्त्र'.
पीएच.डी.चा प्रबंध लिहीत असताना थेलर यांच्या मनात तर्कसंगत गृहितकापलिकडं जाण्याचे विचार सुरू झाले. माणसाची किंमत कशी ठरवायची, यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले. मनुष्यहानी होऊ नये यासाठी एखादा कारखानदार सावधगिरी म्हणून किती खर्च करेल? आणि मनुष्यहानी झाली तर नुकसानभरपाई म्हणून किती खर्च करेल? थेलर यांनी कामगारांना हे दोन प्रश्न विचारले. तर्कसंगत विचार केला तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर सारखंच हवं. सावधगिरी होणारा खर्च हा मनुष्यहानीच्या नुकसानीभरपाई इतकाच गृहीत धरायला हवा. म्हणजे माणसाची किंमत सावधगिरी म्हणून आणि नुकसानभरपाई म्हणून एकच असायला हवी. पण प्रत्यक्षात दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी मिळाली. पहिल्या प्रश्नासाठी खर्चाची किंमत कामगारांनी कमी सांगितली. दुसऱ्या प्रश्नासाठी नुकसानभरपाईची रक्कम जास्त सांगितली. याचा अर्थ असा की, तर्कसंगतीच्या पलिकडे जाऊन माणूस विचार करतो. त्याच्याकडं जे आहे ते गमावण्याची वेळ येते, तेव्हा त्याला त्याची किंमत अधिक वाटते. म्हणजेच व्यक्तीची मानसिकता आणि न्यायबुद्धी या दोन्ही बाबी माणसाच्या निर्णयप्रक्रियेत अधिक महत्त्वाच्या असतात, असा उलगडा थेलर यांना झाला.
थेलर यांनी या मार्गानं पुढं अभ्यास केला. त्यांनी अर्थशास्त्राला मानसशास्त्राची जोड दिली. थेलर आणि त्यांचे मानसशास्त्रातील दोन सहकारी अशा तिघांनी मिळून १) endowment effect, २) status quo bias, ३) loss aversion आणि ४) justice असे प्रामुख्याने चार मुद्दे मांडले. endowment effect म्हणजे व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेवढी धडपड करते त्यापेक्षा जास्त धडपड ती गोष्ट आपल्या हातून गमावू नये यासाठी करते. म्हणूनच एखादी वस्तू तिने समजा १० रुपयांना खरेदी केली आहे आणि ती दुसऱ्याला देण्याची वेळ तिच्यावर ओढावली तर ती व्यक्ती ती वस्तू देण्यास तयार होत नाही आणि ती द्यायचीच वेळ आली तर त्याची किंमत तो अधिक मागते. कदाचित ती ५० रुपयेही मागेल. या endowment effect मुळंच मनुष्यहानीची नुकसानभरपाईची रक्कम कामगारांनी थेलर यांना जास्त सांगितली. status quo bias म्हणजे 'जैसे थे'ला पकडून राहण्याची वृत्ती. जैसे थे परिस्थितीत व्यक्ती सहसा बदल करण्यास तयार नसते. त्यामुळेच भविष्याची सुरक्षा महत्त्वाची वाटत असली तरी वर्तमानात मिळणारा पैसा गुंतवणूक करून हातचा जाऊ देण्यास बहुतांश व्यक्तीची तयारी नसते, असं पाहायला मिळतं. म्हणजेच जैसे थे वृत्ती तर्कसंगत निर्णयप्रक्रियेच्या आड येते. तिसरा मुद्दा म्हणजे loss aversion. जैसे थे परिस्थिती बदल करून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा व्यक्तीला नुकसानीची धास्ती जास्त असते. त्यामुळं तिचा कल नेहमीच नुकसान टाळण्याकडं असतो. फायदा मिळवण्यापेक्षा नुकसान होणार नाही ना याचा विचार अधिक होत असतो. चौथा मुद्दा justice. न्याय. व्यक्तीला एखादी बाब न्याय्य आहे की, नाही हे अधिक महत्त्वाचं वाटतं. मुंबईत पूर आला तेव्हा टॅक्सीवाल्यांनी अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं. किंवा उबर, ओला या टॅक्सीसेवांचे दर पीक अवरमध्ये भरमसाठ होतात. ही बाब न्याय्य नाही असं लोकांना वाटतं. न्याय्य नाही अशी भावना लोकांमध्ये निर्माण होणार नाही यांची खबरदारी आर्थिक घडामोडींमध्ये कळीची ठरू शकते.
प्रा. रिचर्ड थेलर यांना त्यांच्या वर्तनात्मक अर्थशास्त्रातील 'नज थेअरी'साठी (कोपरखळी सिद्धान्त) नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. थेलर यांचा 'कोपरखळी सिद्धान्त' अर्थशास्त्राला वेगळं वळण देणारा असला तरी त्याचा वापर फक्त अर्थशास्त्रापुरताच सीमित राहिलेला नाही. त्याचा वापर उद्योग क्षेत्रात प्रामुख्यानं झाला असला तरी, त्याचा परिघ आंतरराष्ट्रीय राजकारण बदलण्यासाठीही तितकाच प्रभावीपणे झालेला आहे. त्याचप्रमाणे तो अर्थशास्त्राच्या पलिकडे जाऊन राजकारण आणि समाजकारणातही झालेला आहे. विशेषतः जनहिताची धोरणं राबवताना विविध देशांच्या सरकारांनी या सिद्धान्ताचा योग्य उपयोग करून घेतला आहे.
ReplyDeleteथेलर यांचा कोपरखळी सिद्धान्त नेमका काय आहे हे पाहू.
थेलर यांचा सिद्धान्त वर्तनात्मक अर्थशास्त्राशी (behavioural economics) निगडित आहे. कुठल्याही अर्थिक घडामोडीच्या मध्यभागी व्यक्ती असते. ती व्यक्ती काय खरेदी करते, कशी खरेदी करते, तिची आवडनिवड काय, तिच्या खरेदी-विक्रीवर कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो (उदा. वस्तू महाग वा स्वस्त होणे.) अशा मुद्द्यांचा विचार वर्तनात्मक अर्थशास्त्र खोलात जाऊन करते. त्या आधारावर बाजाराचे ठोकताळे ठरतात, बाजाराची दिशा ठरते, मागणी-पुरवठ्याची गणितं मांडली जातात, त्याचा वस्तूंच्या उत्पादनावर, किमतीवर परिणाम होत असतो. इतकेच नव्हे तर नजीकच्या वा लांब भविष्यात व्यक्तीचा कल कसा राहील याचाही अंदाज घेतला जातो. याचा सरळसाधा अर्थ असा की, आर्थिक व्यवहारात व्यक्तीचं वर्तन कसं राहील याचा केलेला अभ्यास म्हणजे 'वर्तनात्मक अर्थशास्त्र'.
पीएच.डी.चा प्रबंध लिहीत असताना थेलर यांच्या मनात तर्कसंगत गृहितकापलिकडं जाण्याचे विचार सुरू झाले. माणसाची किंमत कशी ठरवायची, यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले. मनुष्यहानी होऊ नये यासाठी एखादा कारखानदार सावधगिरी म्हणून किती खर्च करेल? आणि मनुष्यहानी झाली तर नुकसानभरपाई म्हणून किती खर्च करेल? थेलर यांनी कामगारांना हे दोन प्रश्न विचारले. तर्कसंगत विचार केला तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर सारखंच हवं. सावधगिरी होणारा खर्च हा मनुष्यहानीच्या नुकसानीभरपाई इतकाच गृहीत धरायला हवा. म्हणजे माणसाची किंमत सावधगिरी म्हणून आणि नुकसानभरपाई म्हणून एकच असायला हवी. पण प्रत्यक्षात दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी मिळाली. पहिल्या प्रश्नासाठी खर्चाची किंमत कामगारांनी कमी सांगितली. दुसऱ्या प्रश्नासाठी नुकसानभरपाईची रक्कम जास्त सांगितली. याचा अर्थ असा की, तर्कसंगतीच्या पलिकडे जाऊन माणूस विचार करतो. त्याच्याकडं जे आहे ते गमावण्याची वेळ येते, तेव्हा त्याला त्याची किंमत अधिक वाटते. म्हणजेच व्यक्तीची मानसिकता आणि न्यायबुद्धी या दोन्ही बाबी माणसाच्या निर्णयप्रक्रियेत अधिक महत्त्वाच्या असतात, असा उलगडा थेलर यांना झाला.
ReplyDeleteथेलर यांनी या मार्गानं पुढं अभ्यास केला. त्यांनी अर्थशास्त्राला मानसशास्त्राची जोड दिली. थेलर आणि त्यांचे मानसशास्त्रातील दोन सहकारी अशा तिघांनी मिळून १) endowment effect, २) status quo bias, ३) loss aversion आणि ४) justice असे प्रामुख्याने चार मुद्दे मांडले. endowment effect म्हणजे व्यक्ती एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेवढी धडपड करते त्यापेक्षा जास्त धडपड ती गोष्ट आपल्या हातून गमावू नये यासाठी करते. म्हणूनच एखादी वस्तू तिने समजा १० रुपयांना खरेदी केली आहे आणि ती दुसऱ्याला देण्याची वेळ तिच्यावर ओढावली तर ती व्यक्ती ती वस्तू देण्यास तयार होत नाही आणि ती द्यायचीच वेळ आली तर त्याची किंमत तो अधिक मागते. कदाचित ती ५० रुपयेही मागेल. या endowment effect मुळंच मनुष्यहानीची नुकसानभरपाईची रक्कम कामगारांनी थेलर यांना जास्त सांगितली. status quo bias म्हणजे 'जैसे थे'ला पकडून राहण्याची वृत्ती. जैसे थे परिस्थितीत व्यक्ती सहसा बदल करण्यास तयार नसते. त्यामुळेच भविष्याची सुरक्षा महत्त्वाची वाटत असली तरी वर्तमानात मिळणारा पैसा गुंतवणूक करून हातचा जाऊ देण्यास बहुतांश व्यक्तीची तयारी नसते, असं पाहायला मिळतं. म्हणजेच जैसे थे वृत्ती तर्कसंगत निर्णयप्रक्रियेच्या आड येते. तिसरा मुद्दा म्हणजे loss aversion. जैसे थे परिस्थिती बदल करून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा व्यक्तीला नुकसानीची धास्ती जास्त असते. त्यामुळं तिचा कल नेहमीच नुकसान टाळण्याकडं असतो. फायदा मिळवण्यापेक्षा नुकसान होणार नाही ना याचा विचार अधिक होत असतो. चौथा मुद्दा justice. न्याय. व्यक्तीला एखादी बाब न्याय्य आहे की, नाही हे अधिक महत्त्वाचं वाटतं. मुंबईत पूर आला तेव्हा टॅक्सीवाल्यांनी अव्वाच्या सव्वा भाडं आकारलं. किंवा उबर, ओला या टॅक्सीसेवांचे दर पीक अवरमध्ये भरमसाठ होतात. ही बाब न्याय्य नाही असं लोकांना वाटतं. न्याय्य नाही अशी भावना लोकांमध्ये निर्माण होणार नाही यांची खबरदारी आर्थिक घडामोडींमध्ये कळीची ठरू शकते.