Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

स्नायूंमध्ये पेटके आल्यास कोणते वैद्यकीय उपचार घ्यावेत?

2 comments:

  1. स्नायूंमध्ये पेटके आल्यास कोणते वैद्यकीय उपचार घ्यावेत?

    » सर्वप्रथम तुम्ही करत असलेले काम थांबवा आणि पेटके आलेला भाग ताणण्याचा प्रयत्न करा, त्या भागाला मालिश करा.

    » उष्णतेमुळे स्नायूला आराम मिळत असला तरी, वेदना वाढल्यास त्या भागावर बर्फ लावणे हितावह ठरते.

    » स्नायूमध्ये अद्याप सूज असल्यास स्टिरॉईड-मुक्त, जळजळ न करणारी औषधं वेदनेपासून आराम देण्यात मदत करू शकतात.

    » पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचं सेवन न करणे हे खेळताना स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमुख कारण आहे.

    » बहुतेक वेळा, पाणी प्यायल्याने पेटक्यांना आराम पडतो. पण, कधी कधी फक्त पाणी पिणं पुरेसं ठरत नाही. अशा वेळी, शरीरातील खनिजांची हानी भरून काढणा-या सॉल्ट टॅब्लेट्स किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स घेणं उपयुक्त ठरतं.

    ReplyDelete
  2. स्नायूत गोळे का येता त ह्याची कारणे आहेत ती म्हणजे पाण्याचे प्रमाण कमी होणे, मिठाचे सेवन अधिक करणे, रक्तातील सोडियम किंवा पोटॅशियमचे प्रमाण कमी-जास्त होणे, थायरॉइड ग्रंथींचे कार्य शिथिल झाल्यास , पायातील शुद्ध रक्तवाहिन्या आंकुचन पावल्यामुळे, अति मद्यपान..

    स्नायूंमध्ये ताण आल्यास सर्वात पहिल्यांदा आराम करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या स्नायूंमध्ये ताण आला आहे तिथे बर्फ लावल्यास सूज, रक्‍तस्राव आणि वेदना या सर्वांमध्ये आराम मिळतो. स्नायूंमध्ये पेटके आल्यास जितक्या लवकर त्यावर बर्फ लावला जाईल तेवढे अधिक चांगले. स्नायूंमध्ये ताण आल्यास त्यावरील सर्वात परिणामकारक उपाय आहे तो म्हणजे स्ट्रेचिंग. स्नायू जास्त मजबूत आणि लवचिक असतात त्यामुळे सहसा त्यांना इजा होण्याची शक्यता कमी असते. खूप जास्त त्रास होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html