Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

गिलोय meaning आणि त्याचे फायदे काय?

2 comments:

  1. गुळवेल किंवा गुडुची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणुन कॉर्डिफोलिया हे नाव पडले . भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे. हीस अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषधी म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.

    औषधी उपयोग

    नेत्र विकार, वमनविकार, सर्दी पडसे, संग्रहणी, पांडुरोग , प्रमेह, मूत्रविकार, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तशर्कराविकार आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.

    या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरीन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.

    गुळवेलीचे खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. हिच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.

    ReplyDelete

  2. शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास माणूस वरचे वर आजारी पडू लागतो. अशा वेळीस गुळवेल अत्यंत लाभदायक ठरते. गुळवेलच्या नित्य सेवनाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
    वारंवार होणारे सर्दी – पडसे, ताप आणि अशक्तपणा यामध्ये सुद्धा गुळवेल प्रभावी आहे.
    गुळवेल सत्व दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. अर्धा चमचा सत्व घेऊन नंतर दुध साखर ग्यावी कारण हे चवीला कडू असते.
    गुळवेलचा काढा सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. हा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेऊ शकतात.
    दररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा गुळवेल सत्व आणि गाईचे दुध नियमितपणे घेतल्यास तारुण्य दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते.
    गुळवेल कडू चवीची असल्याने मधुमेहात सुद्धा फायदेशीर ठरते. गुळवेलचे नित्य सेवन केल्याने रक्तातील साखर कमी होऊन मधुमेही रुग्णांना होणाऱ्या मज्जादाह आणि अंधत्व या उपद्रवा पासून त्यांची सुटका करते.
    गुळवेल मध्ये रक्ताभिसरण सुधारून हृदयाला बळकटी देण्याची शक्ती आहे. वृद्धांना आणि हृदयरोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांसाठी गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट खूप फायदेशीर ठरते.
    जुनाट मुरलेल्या तापात सुद्धा गुळवेल सत्वामुळे आराम मिळतो.
    यकृताचे विकार किंवा कावीळ झाल्यास अर्धा चमचा गुळवेलसत्व आणि अर्धा चमचा हळद एक चमचा मधासोबत दिवसातून दोन तीन वेळा खायला द्यावे.
    पंडुरोग किंवा रक्तक्षय झाला तर रुग्णाला गुळवेल सत्व किंवा अमृतारीष्ट द्यावे.
    गुळवेलचे चूर्ण आणि दुध साखर स्त्री – पुरुषांच्या जननसंस्थेच्या अनेक विकारांमध्ये लाभदायक ठरते.
    गुळवेलच्या नित्य सेवनाने मानसिक तणाव सुद्धा कमी होतो.
    गुळवेल रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.
    डेंग्यूच्या तापात रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी वेगाने कमी होतात. अश्या वेळीस गुळवेल दिल्यास पांढऱ्या रक्तपेशी लवकर सामान्य होतात. तसेच चिकनगुनिया, स्वाईन फ्लू आणि फ्लू मध्ये देखील गुळवेल खूप हितकारक आहे.
    गुळवेलच्या कोवळ्या पानांची भाजी बनवतात. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ही भाजी लाभदायक ठरते. तसेच ताप येऊन गेल्यानंतरही शरीराची ताकद वाढविण्यासाठी हि भाजी उपयुक्त आहे.
    कुष्ठरोग आणि संधिवात या सारख्या रोगातही गुळवेलच्या सेवनाने आराम मिळतो.
    वारंवार जुलाब होत असल्यास सकाळी उपाशीपोटी गुळवेलच्या वेलीचा रस प्यावा.
    गुळवेल कॅन्सर सारख्या रोगात सुद्धा उपयोगी ठरते. गव्हांकुराच्या रसासोबत गुळवेलचा रस सकाळी उपाशीपोटी, आठवड्यातून तीनदा घ्यावा किंवा एक दिवसा आड घ्यावा.

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html