Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

जीवनात शिष्टाचार ची आवश्यकता का आहे ??


1 comment:

  1. शिष्टाचार म्हणजे जीवनशैली ज्यामध्ये आपले व्यक्तिमत्व दिसून येते. शिष्टाचार ही समाजात मानवाची पहिली ओळख आहे. इतरांसाठी आपला प्रभाव किती चांगले किंवा वाईट आहे, ते आपल्या वर्तनावर अवलंबून आहे जे आपण इतरांशी करतो.सभ्य वर्तनाने इतरांवर चांगला प्रभाव पडतो, इतरांना सद्भावना, प्रेम आणि सहकार्य मिळते. समाजात आपली लोकप्रियता वाढते. ह्या उलट, अश्लील कृत्य इतरांमधे तिरस्कार, द्वेष निर्माण करते. अधार्मिक व्यक्तीला क्वचितच कोणतीही घनिष्ठ मित्रता प्राप्त होते. अशिष्टता हा शाप आहे ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही आणि समाजात आपल्याला एकटे सोडते. जरी माणसामध्ये कोणता वैशिष्ट गुण वा आकर्षण नसेल तरी शिष्टचारामुळे दुसर्याची सदभावना आपल्याला मिळते. त्यामुळे ते आपल्या आयुष्याच्या वाटचालीत उपयोगी आणि आवश्यक असते.

    संवादात्मक संभाषणांमधून, भाषण पासून सेवा, त्याग, इतरांबद्दल आदर, हे सगळे शिष्टाचारात येतात. शिष्टाचार म्हणजे आपल्या वर्तनाची आणि वागणुकीची नैतिक मूल्ये आहेत , ज्यावर सभ्यता आणि संस्कृतीची इमारत बांधली गेली आहे. सौम्यता, दुसर्याबद्दल सहानुभूती, सहकार इत्यादि शिष्टाचाराचे आदर्श आहेत.

    समाजात आपण जिथे जिथे लोंकाच्या संपर्कात येतो तिथे तिथे आपल्याला शिष्टाचारची आवशक्यता असते. घरात लहानांपासून मोट्यापर्यंत सगळ्यांना शिष्टाचारची आवशक्यता असते. लहानांपासून मोट्यापर्यंत सगळ्यांशी वागताना देखील शिष्टाचारची आवशक्यता असते.

    शिष्टाचार मन कोणालाही त्रास देत नाही. ते कोणाबद्दल वाईट बोलत नाही. दुसऱयांचा मन दुखावेल असे कार्य ते कधीच करत नाही. ते कधीही अभिमान बाळगत नाही.

    शिष्टाचार कुठे भेटतो ??
    शिष्टाचार हा कुठे हि भेटत नाही .. आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. तो आचरणात आणावा लागतो. त्यासाठी मोठ्या खानदानात जन्म घेण्याची गरज नाही. ते आत्मसात करावा लागतो . शिष्टाचारात सर्वात महत्वाचे असते ती दुसर्याची भावना.. शिष्टाचारात दुसर्याची भावनांची काळजी घेतली जाते.

    ReplyDelete

Plz..उत्तर मराठी भाषेतच द्या...

तुमचा प्रश्न विचारा ?? >> https://ask-me-marathi.blogspot.com/p/your-question.html